`मी अजूनही व्हर्जिन` म्हणत तरुणानं केला बेछूट गोळीबार, California shooting: Girls never loved me, ki

`मी अजूनही व्हर्जिन` म्हणत तरुणानं केला बेछूट गोळीबार

`मी अजूनही व्हर्जिन` म्हणत तरुणानं केला बेछूट गोळीबार
www.24taas.com, झी मीडिया, कॅलिफोर्निया

अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया राज्यात एका चालत्या गाडीतून झालेल्या अंदाधुंद गोळीबाराच्या घटनेत सात जण मारले गेलेत तर सात जण जखमी झालेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सांता बारबरा शहरातील इस्ला विस्ता भागात ही घटना घडली. ‘यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया – सांता बारबरा’जवळच ही जागा आहे. या भागात विद्यार्थी राहतात.

मिळालेल्या माहितीनुसार, एका 22 वर्षांच्या एलिट रॉजर नावाच्या तरुणानं हा अंदाधुंद गोळीबार केलाय. आपल्याकडे मुली आकर्षित होत नाहीत, या न्यूनगंडातून एलिटनं हा गोळीबार केल्याचं समोर आलंय. ‘मी 22 वर्षांचा आहे आणि तरीही अजून मी व्हर्जिन आहे. मी अजूनपर्यंत कोणत्याही मुलीला किसही केलेलं नाही’ असं म्हणणारा एक व्हिडिओ एलिटनं स्वत:च शूट केलेला आहे आणि त्यानं हा व्हिडिओ यूट्यूबवरदेखील अपलोड केलाय.

सात मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये या मुलानं आपल्या एकटेपणाबद्दल सांगितलंय. आपण मुलींचा बदला घेणार असंही त्यानं यात म्हटलंय. प्रत्येक सुंदर मुलीला आपलं टार्गेट बनविण्यासाठीच त्यानं गोळीबारासाठी युनिव्हर्सिटीचा भाग निवडला. काळ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू गाडीतून एलिटनं बेधुंद गोळीबार केल्याचं प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितलं.

व्हिडिओ पाहा : एलिट रॉजरचा हाच तो व्हिडिओ



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, May 25, 2014, 14:23


comments powered by Disqus