Last Updated: Wednesday, November 14, 2012, 18:23
www.24taas.com, वॉशिंग्टन पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्ती मलाला युसूफजई हिला नोबेल शांति पुरस्कारासाठी नामांकन मिळावं, यासाठी अमेरिकेत एक ऑनलाईन अभियान सुरू झालंय.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र हिलरी क्लिंटन यांच्यासोबच अमेरिकेतील अनेक नेत्यांशी नागरिकांच्या संघटनेनं संपर्क साधून मलला हिला नोबल पुरस्कारासाठी नामांकन मिळावं, अशी मागणी केलीय. केवळ तीन दिवसांत या अभियानात अकरा हजारांपेक्षा जास्त नागरिक सहभागी झालेत.
`या अभियानाची सुरुवात कॅनडामध्ये झालीय. फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, इटली, स्पेन आणि भारतातही याच पद्धतीचं अभियान सुरू आहे. यामध्ये आत्तापर्यंत ११५,००० लोक सामील झालेत.
First Published: Wednesday, November 14, 2012, 18:23