Last Updated: Thursday, April 10, 2014, 16:34
www.24taas.com, वृत्तसंस्था, दमिश्कसीरियामध्ये आज दोन कार बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले. या स्फोटाता कमीत कमी २५ लोकांचा बळी गेला आहे. यामध्ये लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे.
सरकारी सूत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या स्फोटात १०० लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. तर २५ लोक मृत्यूमुखी पडलेत. दोन कार बॉम्बस्फोटात १०७ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
सीरियामध्ये आजही तणावग्रस्त परिस्थिती आहे. या हल्ल्याची अजून कोणीही जबाबदारी स्वीकारली नाही. मात्र, वाढत जाणारी हिंसा ही सीरिया प्रशासनाची डोकेदुखी झाली आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, April 10, 2014, 16:10