ओबामांच्या मुलींचा पाठलाग करणारा जेरबंदCar follows Obama daughters` motorcade, triggers White House

ओबामांच्या मुलींचा पाठलाग करणारा जेरबंद

ओबामांच्या मुलींचा पाठलाग करणारा जेरबंद
www.24taas.com,वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या मुलींना घेऊन जाणाऱ्या कारचा पाठलाग केला गेल्यानंतर व्हाइट हाऊस सध्या बंद करण्यात आलंय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अति सुरक्षा असलेल्या परिसरात अधिकाऱ्यांनी पाठलाग करण्याऱ्या कारला रोखलं आणि कार चालकाला ताब्यात घेतलं.

ही घटना मंगळवारी स्थानिक वेळेनुसार जवळपास ४ वाजून ४० मिनिटांची आहे. त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व्हाइट हाऊसमध्ये विदेश मंत्री जॉन केरी यांच्यासोबत चर्चा करत होते.

व्हाइट हाऊस बंद केल्याच्या एका तासानंतर ते पुन्हा उघडण्यात आलं. पाठलाग करणारा कार चालक ५५ वर्षीय मॅथ्यू इवान गोल्डस्टीन नावाचा असल्याचं सांगण्यात येतंय. त्यानंतर त्याला अटकही करण्यात आला आणि अनधिकृतरित्या प्रवेश करण्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला.

आता पुढील कारवाईसाठी त्याला शहर पोलिसांनी हवाले करण्यात आलंय. सांगण्यात येतंय की तो व्यक्ती इंटर्नल रेव्हेन्यू सर्विसेसमध्ये कार्यरत आहे आणि त्याच्याजवळ व्हाइट हाऊस जवळील ट्रेजरी ब्लिडिंगमध्ये जाण्याचा पासही होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 7, 2014, 18:07


comments powered by Disqus