Last Updated: Thursday, July 18, 2013, 23:37
www.24taas.com, झी मीडिया, इस्लामाबादएस्सेल ग्रुपचे चेअरमन सुभाष चंद्रा यांनी आज इस्लामाबादमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतली. भारत-पाकिस्तान या शेजारी देशात शांतता आणि स्थैर्य नांदावं यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं चंद्रा यांनी यावेळी सांगितलं.
नवाज शरीफ यांच्या निमंत्रणावरुन चंद्रा सध्या पाकिस्ताच्या दौ-यावर आहेत. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांना एकत्र आणण्यासाठी मीडियाची भूमिका महत्त्वाची आहे, असं मत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी व्यक्त केलंय.
पाकिस्तानी माध्यमांबाबतची भूमिका भारतानं लवचिक करावी अशी मागणीही शरीफ यांनी यावेळी केली.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, July 18, 2013, 23:35