Last Updated: Tuesday, April 1, 2014, 13:18
www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई सफरचंदाची साल काढण्याचा तुम्हांला खूपच कंटाळा येतो ना! मात्र आता हे काम एका शेफनं सोपं करुन दिलंय. या शेफनं सफरचंद सोलण्याचा एक अनोखा मार्ग शोधून काढलाय.
तो सफरचंदाच्या मधोमध ड्रिल मशीन टाकतो, त्यावर साल काढण्याचं यंत्र ठेवून ड्रिल मशीन सुरु करतो. त्यामुळं ड्रिल मशीनसोबत सफरचंद वेगाने फिरतो आणि साल काढण्याच्या यंत्रानं त्याची पूर्ण साल फक्त दोन सेंकदात निघते.
फेसबुकवर ‘जॅस्पर वॅन रॅम्सहॉर्स्ट’ नावाच्या व्यक्तीनं हा व्हिडिओ अपलोड केलाय. ज्याला आतापर्यंत १ लाख २० हजारांपेक्षा जास्त लोकांनी शेअर केलंय. मात्र त्या शेफचं नाव अजून समजू शकलं नाहीय. कदाचित तो शेफ नेंदरलॅण्डमधील असल्याचा संभव आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडीओ
First Published: Tuesday, April 1, 2014, 13:18