Last Updated: Friday, February 14, 2014, 21:33
www.24taas.com, झी मीडिया, बीजिंग चीनमधील समलिंगी महिला आणि पुरूषांनी `व्हॅलेंटाईन डे`चं निमित्त साधत रशियातील समलैंगिक संबंधांविरोधी कायद्याचा निषेध नोंदवलाय.
यासाठी, लेस्बियन, गे, बायसेक्सुअल, ट्रांसजेंडर (एलजीबीटी) समुदायातील कार्यकर्त्यांनी `व्हॅलेंटाइन डे`चं निमित्त साधलं. यावेळी त्यांनी चीनच्या राजधानीत बीजिंग इथं एका चुंबन मोर्चाचं आयोजन केलं होतं...
आंदोलनादरम्यान, `एलजीबीटी`तल्या काही जणांनी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांचं छायाचित्र लावलेला एक फलक तयार केला होता. या फलकावरील पुतीन यांचे छायाचित्र एखाद्या समलैंगिकांसारखं रंगवण्यात आलं होतं. `टू रशिया विथ लव्ह` असा संदेशही या फलकावर लिहिण्यात आला होता... आणि चीनच्या समलैंगिक पुरुष (गे) आणि समलैंगिक स्त्रियांनी (लेस्बियन) पुतीन यांच्या छायाचित्राचं चुंबन घेत आपला निषेध नोंदवत अनोख्या पद्धतीनं `व्हॅलेंटाइन डे` साजरा केला.
`सर्वांना प्रेम करण्याचा अधिकार आहे... असा संदेश आम्हाला व्हॅलेंटाइन डेनिमित्तानं द्यायचाय` असं आपलं म्हणणं शियाओ टाय या आंदोलनकर्त्यानं व्यक्त केलंय. चीनमध्ये १९९७ पर्यंत समलिंगी संबंध हा गुन्हा होता आणि त्यानंतर हा मानसिक आजार म्हणून गणला जाऊ लागला. यामध्ये शिक्षेसह सक्तीचे मानसोपचारही करण्यात येतात.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, February 14, 2014, 21:17