Last Updated: Thursday, November 8, 2012, 13:04
www.24taas.com, बिजिंगजगातील दादा देश समजल्या जाणा-या अमेरिका आणि चीनमध्ये नेतृत्व बदल होतायेत. अमेरिकेतल्या अध्यक्षीय निवडणुकीत ओबामांनी पुन्हा बाजी मारलीये. तर चीनमध्ये शि जिन पींग हे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून चीनची सुत्र स्वीकारणार आहेत.
हू जिंताव यांच्याकडून ते चीनची सूत्र स्वीकारणार आहेत. चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या पाचव्या पिढीचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. चीनचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. 59 वर्षाच्या पींग यांनी 1974 पासून पींग यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.
शांघाय शहराचे प्रमुख ते पॉलिट ब्युरो सदस्य अशी त्यांची कारकिर्द बहरत गेली. हू जिंताओंचीच धोरणं पींग हे पुढ राबवतील की त्यांच्या कामाचा वेगळा ठसा निर्माण करतील याबाबत उत्सुकता निर्माण झालीये. जगातल्या दोन प्रमुख देशातील निवडणुका आणि चीनमधील सत्ताबदलामुळं जगाच्या राजकारणावर परिणाम होणार आहे.
First Published: Thursday, November 8, 2012, 13:01