Last Updated: Tuesday, May 14, 2013, 17:27
www.24taas.com, झी मीडिया, बीजिंगलडाखमधून चीनने आपलं सैन्य मागे घेतलं असतानाच भारतीय समुद्री भागांमध्ये चीनने आपलं सैन्य घुसवण्यास सुरूवात केल्याचं दिसून आलं आहे. भारतीय समुद्री तटांनजीक चीनी पाणडुब्या आणि जहाजं वाढू लागली आहेत.
चीनचं भारतीय समुद्रामध्ये घुसत असलेलं सैन्य भारतीय नौसेनेसाठी डोकंदुखी ठरू लागलं आहे. मंगळवारी होणाऱ्या नेव्हीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत २२ वेळा चीनी पाणडुब्यांशी सामना करावा लागलण्याचं इंटिग्रेटेड डिफेंस स्टाफ हेडक्वार्ट्र्सच्या अहवालात स्पष्ट केलं गेलं आहे. चीनने बांग्ला देश, म्यानमार, श्रीलंका, पाकिस्तान या देशांच्या समुद्री सीमांवरही आपलं सैन्य वाढवलं आहे.
येत्या वीस वर्षांत भारत आणि चीन १०० नव्या सबमरीन्स आणि जहाजं मागवणार असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील एका नौसैनिक कंसल्टन्सी फर्मने ही माहिती दिली आहे. समुद्रात होऊ घातलेली ही चीनी घुसखोरी भारतासाठी मोठं आव्हानु ठरू शकते.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, May 14, 2013, 17:27