तब्बल दीड तास वॉशिंग मशिनमध्ये अडकली चिमुकली!, Cimukali washing machine stuck in a staggering half h

तब्बल दीड तास वॉशिंग मशिनमध्ये अडकली चिमुकली!

तब्बल दीड तास वॉशिंग मशिनमध्ये अडकली चिमुकली!
www.24taas.com, वृत्तसंस्था, न्यूयॉर्क

अमेरिकेत एका कुटुंबातील ११ वर्षाची मुलगी घरातील मुलांबरोबर लपंडाव खेळत असताना वॉशिंग मशिनमध्ये अडकली. मुलीला तब्बल ९० मिनिटांनंतर वॉशिंग मशिनमधून बाहेर काढण्यात आलं.

उटाच्या साल्टलेक शहरातील ही मुलगी घरात आपल्या बहीन आणि चुलत भावंडांसोबत लपंडाव खेळत होतो. त्यामुळं ती मुलगी खेळण्याच्या नादात वॉशिंग मशिनमध्ये जाऊन लपली.

न्यूयॉर्क डेली या न्यूज वृत्तपत्रानुसार, मुलगी वाशिंग मशीनमधील ड्रायरमध्ये अडकली. ही मुलगी ९० मिनिटांपर्यंत वॉशिंग मशिनमध्ये अडकून पडली होती. त्यानंतर त्या मुलीच्या आईनं ९११नंबरवर फोन करुन अग्निशमन दलाला बोलवलं. अग्निशमन दलाच्या लोकांनी त्या मुलीला सुखरुप बाहेर काढलं. या मुलीचं नाव वृत्तपत्रात छापण्यात आलेलं नाही.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, January 5, 2014, 18:58


comments powered by Disqus