सिटी ग्रुपचे सीईओ विक्रम पंडितांचा राजीनामा, City Group CEO Vikram Pandit resigned

सिटी ग्रुपचे सीईओ विक्रम पंडितांचा राजीनामा

सिटी ग्रुपचे सीईओ विक्रम पंडितांचा राजीनामा
www.24taas.com, न्‍यूयॉर्क

सिटीग्रुपचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी विक्रम पंडित यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. पंडित यांच्‍या जागेवर कंपनीच्‍या संचालक मंडळाने मायकल कॉर्बट यांची नियुक्ती केली आहे. पंडित यांच्‍या राजीनाम्‍यामागील कारण स्‍पष्‍ट करण्‍यात आले नाही.

परंतु, गेल्‍या महिन्‍यात संपलेल्‍या तिमाहीमध्‍ये कंपनीच्‍या नफ्यात 88 टक्‍के घट नोंदविण्‍यात आली होती. हे यामागील प्रमुख कारण असण्‍याची शक्‍यता वर्तविण्‍यात येत आहे.

राजीनाम्‍यानंतर दिलेल्‍या संदेशात त्‍यांनी कंपनीच्‍या सर्व सहका-यांचे आभार मानले. सिटीग्रुप एकेकाळी प्रचंड आर्थिक संकटात होता. परंतु, पंडित यांच्‍या नेतृत्त्वात कंपनी मजबूत स्थितीत आली.


First Published: Tuesday, October 16, 2012, 19:12


comments powered by Disqus