मॅक्डोनल्ड्समध्ये लहानग्याने गिळला काँडोम! condom engulfed by 2 years old in McDonalds

मॅक्डोनल्ड्समध्ये लहानग्याने गिळला काँडोम!

मॅक्डोनल्ड्समध्ये लहानग्याने गिळला काँडोम!
www.24taas.com, शिकागो

भारतासह जगभरात मॅक्डोनल्ड्सचा बर्गर प्रचंड लोकप्रिय आहे. तसंच आकर्षक आणि स्वच्छ असणाऱ्या मॅक्डोनल्ड्स फ्रंचाइजी जगभरात नावाजल्या जातात. पण अमेरिकेतल्या शिकागोमध्ये अशी घटना घडली आहे, की त्यामुळे मॅक्डोनल्ड्स अडचणीत आलंय. मॅक्डोनल्डमध्ये एका दोन वर्षाच्या मुलाने चक्क काँडोम गिळला.

मॅक्डनल्डच्या प्ले एरिआमध्ये पडलेलं एक काँडोम दोन वर्षांच्या मुलाने गिळला. तेथील अस्वच्छतेमुळेच असं घडल्याचा आरोप लहानग्याच्या आईने मॅक्डोनल्ड्सवर केला आहे. तसंच या मॅक्डोनल्ड्स रेस्टॉरंटवर तिने ५० हजार डॉलर्सचा खटलाही दाखल केला आहे.

मॅक्डोनल्ड्सच्या प्ले एरिआत लहान मुलांना खेळण्यासाठी जागा असते. मात्र या जागेत काँडोम पडले असल्याचे कुणाच्याही लक्षात आलं नाही. यामुळे स्वछ्छता करणाऱ्यांनी या काँडोमची विल्हेवाट लावली नाही. खेळादरम्यान दोन वर्षांच्या लहानग्याने उत्सुकतेपोटी हे काँडोम गिळला आणि त्यामुळे मॅक्डोनल्ड्सवर संक्रांत आली आहे.

First Published: Sunday, March 17, 2013, 16:44


comments powered by Disqus