जगातील भ्रष्टाचारी देशांची यादी जाहीर; भारताचा नंबर आहे..., Corruption Perceptions Index for 2013 by

जगातील भ्रष्टाचारी देशांची यादी जाहीर; भारताचा नंबर आहे...

जगातील भ्रष्टाचारी देशांची यादी जाहीर; भारताचा नंबर आहे...
www.24taas.com, झी मीडिया, बर्लिन

भारतात सगळ्यात जास्त भ्रष्टाचार बोकाळला आहे... असं आपण बऱ्याचदा ऐकत असतो ना! पण, जगाच्या पाठिवर भ्रष्टाचारात भारताचा नंबर कितवा आहे ९४ वा... मग, जगातील सगळ्यात भ्रष्टाचारी देश ठरलेत... अफगाणिस्तान, उत्तर कोरिया आणि सोमालिया…

‘ग्राफ्ट वॉचलॉग ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल’ या संस्थेनं भ्रष्टाचारी देशांचं सर्वेक्षण करून यादीच जाहीर केलीय. यामध्ये सर्वात स्वच्छ प्रतिमा आढळलीय ती डेन्मार्क आणि न्यूझीलंड या देशांची. या यादीत भारत ९४ व्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी भारत ९५ व्या क्रमांकावर होता. यंदाच्या यादीत भारताचे शेजारी म्हणजे चीन आणि पाकिस्तान अनुक्रमे ८० आणि १२७ व्या क्रमांकावर आहे.

भ्रष्टाचाराबाबतच्या नियमांमध्ये गेल्या वर्षीच्या व यंदाच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे, असंही कंपनीनं स्पष्ट केलंय. यंदा करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये भारताला १०० पैकी ३६ गुण मिळाले आहेत. शून्य गुण म्हणजे पूर्णपणे भ्रष्टाचारी तर १०० पैकी १०० गुण म्हणजे स्वच्छ प्रतिमा असलेला देश.... आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध देशांचे मूल्यांकन करण्यात आलं होतं. प्रत्येक देशाला मिळालेल्या गुणानंतर त्या देशातील भ्रष्टाचार यादीतील स्थान ठरविण्यात आलंय. जगभरातील 70 टक्के देशांमध्ये भ्रष्टाचाराबाबत गंभीर समस्या आहे. त्या देशांमधील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावं लागतंय, असं या सर्वेक्षणातून समोर आलंय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, December 4, 2013, 15:55


comments powered by Disqus