Last Updated: Tuesday, December 24, 2013, 17:10
www.24taas.com, वृत्तसंस्था, न्यू यॉर्ककौटुंबिक वाद हे प्रत्येकाच्या घरात असतात, पण त्यांचा सामना करून त्यातून मार्ग काढण्याची कसरत ही स्त्री-पुरूषांना करावी लागते. पण असा मार्ग काढता आला नाही म्हणून न्यू यॉर्कमधील एका व्यक्तीने स्वतःच्या तीन वर्षाच्या मुलाला ५२ व्या मजल्यावरून फेकून स्वतः नंतर उडी घेतली.
मुलाचा ताबा कोणाकडे असावा यावरून पत्नीशी चाललेल्या वादातून ३५ वर्षीय दिमित्री कानारिकोव याने हे भयानक पाऊल उचलले. दिमित्री हा इमारतीच्या खालीच मरण पावला, तर मुलगा किरील कानारिकोव याने हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.
किरीलच्या आईकडे मुलाची कस्टडी होती. पित्याला भेटण्याचे अधिकार होते. रविवारी सायंकाळी पोलिसांच्या उपस्थितीत दिमित्रिला मुलगा आईच्या ताब्यात द्यायचा होता. पण त्याने हे धक्कादायक पाऊल उचलून स्वतःचे आणि मुलाचे जीवन संपवले.
न्यूयॉर्कमध्ये मुलासह आत्महत्या केल्याची ही दुसरी घटना आहे. मार्चमध्ये एका महिलेने मुलाला कुशीत घेऊन आठव्या मजल्यावरून उडी मारली होती. त्यात १० महिन्यांचे मूल वाचले होते.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, December 24, 2013, 17:10