Last Updated: Saturday, July 20, 2013, 21:23
www.24taas.com, झी मीडिया, डेट्रॉइटसर्वशक्तिमान महासत्ता असं बिरुद मिरवणा-या अमेरिकेवर एका प्रमुख शहराची पालिका दिवाळखोरीत काढण्याची नामुष्की ओढवली आहे. अमेरिकेच्या मिशिगन प्रांतातील डेट्रॉईट या शहरावर ही आपत्ती ओढवली आहे.
डेट्रॉइट शहराचे आपत्कालीन व्यवस्थापक केविन ऑर यांनी गुरुवारी या दिवाळखोरीचा प्रस्ताव सादर केला. प्रांतीय न्यायाधीशांनी त्यावर मोहर उमटवल्यास ही पालिका दिवाळखोरीत निघेल. गेल्या काही वर्षात या पालिकेचा आर्थिक डोलारा पूर्णपणे कोसळल्यानं तिच्यावर तब्बल साडेअठरा अब्ज अमेरिकी डॉलरचे कर्ज आहे.
महापालिका कर्जाच्या खाईत रुतली आहे. डेट्रॉईट शहराची परिस्थिती सध्या फारच बिकट झाली आहे. शहराला पाणीपुरवठा , स्वच्छता यासारख्या मूलभूत सुविधा पुरवणेही पालिकेला अशक्य झाले आहे. रस्त्यावरील ४० टक्के दिवे बंद असल्याचं सांगण्यात येत आहे. अनेक पालिका कर्मचाऱ्यांना नोकरी सोडावी लागली आहे. त्यामुळे शहराचे व्यवहार सुरू ठेवण्यासाठी महापालिकेला दिवाळखोरी घोषित करण्यावाचून पर्याय उरलेला नाही.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Saturday, July 20, 2013, 21:23