Last Updated: Thursday, March 6, 2014, 13:40
www.24taas.com, झी मीडिया, मुबंईजन्मजातच काहीजणांना मायक्रोटियाचा सामना करावा लागतो. मायक्रोटिया म्हणजेच कानाच्या बाहेरील भाग विकसित होत नाही. मात्र आता मायक्रोटियावर ब्रिटनच्या शास्त्रज्ञांनी मात केली आहे. ब्रिटनमध्ये प्रयोगशाळेत नाक आणि कान बनवून मानवी शरीरांवर प्रत्यारोपण करण्याचा प्रयोग सुरू आहे.
लंडनमधील ग्रेट अलमंड स्ट्रीट हॉस्पिटलच्या डॉक्टरांची प्रयोगशाळेत मायक्रोटियाची चाचणी चालू आहे. मानवी शरीरामधून चरबीपासून बनवलेल्या स्टेम पेशी काढल्या. त्याच्यापासून नरम हांड विकसित केलं आहे. कानांच्या आकारच्या साच्यात स्टेम सेल ठेवून, त्यांवर त्यांच आकाराचा दुसरा साचा ठेवला जातो.
या प्रक्रियेत रसायनांचा वापर कूर्चा पेशीमध्ये स्टेम पेशी विकसित करण्यासाठी वापरले जाईल. डॉक्टरांच्या कौशल्यांने कानाच्या बाहेरील भाग लावता येणार आहे. मात्र यांच्याद्वारे ऐकू येऊ शकणार नाही.
स्टोम सेलच्या मदतीने कुर्चा बनवता येईल ही एक आश्चर्यकारक आहे. जन्मापासून मायक्रोटियाग्रस्त असलेल्या पीडिताला यांच्या उपयोग होईल, असे ग्रेट अरमंड स्ट्रीट हॉस्पिटलचे प्लॉस्टिक सर्जन नील बुलस्ट्रोड यांनी सांगितले.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, March 6, 2014, 13:40