Last Updated: Thursday, August 8, 2013, 19:02
www.24taas.com, झी मीडिया, लंडनब्रिटनमध्ये न्यायालयात एक आश्चर्यकारक आदेश देण्यात आला आहे. एका भारतीय महिलेला तिच्या पतीसोबत न झोपण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. जर ती आपल्या पतीसोबत झोपली, तर तिला तुरुंगात टाकण्याचा इशाराही कोर्टाने दिला आहे.
बर्मिंघम येथील कोर्ट ऑफ प्रोटेक्शनचे न्यायाधीश होलमॅन यांनी यासंदर्भात खुलासा केला. महिलेचा पती हा शरीरसंबंधांसाठी मानसिकदृष्ट्या सहमत नसल्याचं न्यायाधीशांनी म्हटलं आहे. या दोघांचा विवाह झाला असला तरी पती मानसिकदृष्ट्या अशक्त असल्यामुळे त्याच्याशी शरीरसंबंध ठेवण्याची जबरदस्ती केल्यास तो शोषणाचा पीडित ठरेल. मुख्य म्हणजे पती-पत्नींच्या घटस्फोटाला खुद्द पत्नीनेच नकार दिला आहे.
अशा प्रकारचा निवाडा हा ब्रिटनच नव्हे तर जगात पहिल्यांदाच झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. पती मानसिकदृष्ट्या सशक्त नसूनही पत्नीबद्दल सहानुभूती बाळगून घटस्फोटाला नकार देण्यात आला आहे. मात्र, पत्नी पतीजवळ शरीरसंबंधांची मागणी करू शकत नाही. त्यामुळे ती पतीसोबत झोपल्यास हा एक गंभीर गुन्हा ठरू शकतो.
हे कुटुंब भारतातील पंजाबमधील असून २००९ साली आई- वडिलांसोबत तो मुलगा ब्रिटनला स्थायिक झाला. आज त्याचं वय ४० वर्षं आहे. मात्र तो मानसिकदृष्ट्या अशक्त आहे. विवाहापूर्वी पत्नीला या गोष्टीची माहिती नव्हती. पत्नी अनेक वेळा त्याच्यासोबत झोपली आहे. मात्र यापुढे ती त्याच्यासोबत झोपू शकत नाही.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, August 8, 2013, 17:55