Last Updated: Friday, October 4, 2013, 12:04
www.24taas.com, वृत्तसंस्था, वॉशिंग्टन हॉलिवूड चित्रपटातील थरार पाहावा, अशी घटना प्रत्यक्ष रस्त्यावर घडली. व्हाईट हाऊसपासून कॅपिटल हिलकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी फायरिंग करून कार रोखली नाही तर एका महिलेलाही टिपले. त्यामुळे व्हाईट हाऊसजवळ भीतीचा गोळा नागरिकांच्या पोटात उठला.
हॉलिवूडमधील चित्रपटांप्रमाणे एका कारचा पाठलाग करून पोलिसांनी ही कार चालवित असलेल्या एका महिलेस ठार केल्याचे वृत्त आज शुक्रवारी सूत्रांनी दिले. या थरारक प्रकारामुळे कॅपिटल हिल भागात खळबळ उडाली. कनेक्टिकटमधील मिरीयाम केरी (३४) या महिलेच्या नावावर या गाडीची नोंदणी झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
केरी हीच गाडी चालवित असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले . या गाडीमधील संशयित व्यक्तीस ठार करण्यात आले आहे असे वॉशिंग्टनच्या पोलीस दलप्रमुख कॅथी लॅनिअर यांनी सांगितले आहे. काळ्या रंगाची गाडी चालवित असलेली केरी ही अनपेक्षितरित्या व्हाईट हाऊस परिसरात पोहोचल्याचे सूत्रांनी सांगितले.
केरीबरोबर या गाडीमध्ये तिची एक वर्षाची मुलगीही असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या मुलीस रुग्णालयात दाखल केले आहे. केरी हिला काही मानसिक आजार असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. येथील गेटजवळ केरी हिने सुरक्षा दलास न जुमानता गाडी भरधाव नेली. तसेच येथील काही अधिकाऱ्यांच्याअंगावर गाडी घालण्याचाही तिने प्रयत्न केला.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Friday, October 4, 2013, 12:01