Last Updated: Thursday, July 4, 2013, 17:17
www.24taas.com, झी मीडिया, लंडनएक अब्ज वर्षानंतर पृथ्वी होणार नष्ट असं नुकत्याच झालेल्या एका संशोधनामधून समोर आलं आहे. पृथ्वीवरुन सजीवांचा पूर्णपणे अस्तित्व पुसले जाणार आहे. जीव जंतू, झाडे झुडुपे सर्वाचा ऱ्हास होणार आहे.
हवामानातील विषारी वायुंचं प्रमाणामुळे पृथ्वीवर ग्लोबल वॉर्मिंग वाढत असल्याचं संशोधकांकडून स्पष्ट करण्यात आलंय. पृथ्वीचा नाश हा वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं वाढत्या प्रमाणामुळे होणार असल्याचंही त्यांनी सांगितल आहे.
पुढील एक अब्ज वर्षामध्ये हवामानात बदल घडून येणार आहे. बाष्पीभवनात वाढ होऊन पावसाच्या पाण्यामध्ये रासायनिक बदल होईल, याचाच परिणाम म्हणून वातावरणातील कार्बन डायऑक्साईड पूर्णपणे कमी होणार आहे असं सेंट अॅंड्रयु युनिवर्सिटीच्या एस्ट्रोबायोलॉजिस्ट जॅक ओ मैली यांनी सांगितलं आहे. यानंतरही पृथ्वीतलावर ऑक्सिजनचं काही प्रामाणात राहिल मात्र सर्व महासागर आटल्यामुळे पृथ्वीचं तापमान वाढणार आहे.
पृथ्वीतलावरील महासागर आटण्याचं एकमेव कारण फक्त सूर्य असणार आहे. कारण, सूर्यातून निघणारी किरणे सर्व पाणी शोषून टाकणार. सुर्यातील होणाऱ्या या बदलांमुळेच पृथ्वीवरुन सजीव पूर्णपणे नष्ट पावणार आहे. पण, याला कारणीभूत केवळ सूर्यच नसून वाढत ग्लोबल वॉर्मिंग आणि सगळ्यात मुख्य कारण माणसाकडून नष्ट होणारी वनसंपत्ती हे असणार आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, July 4, 2013, 17:17