पृथ्वीचा भाऊ सापडला, नवा ग्रह सापडला, Earth spinning in the sky - got moving his big brother !

पृथ्वीचा भाऊ सापडला, पृथ्वीपेक्षा मोठा ग्रह सापडला

पृथ्वीचा भाऊ सापडला, पृथ्वीपेक्षा मोठा ग्रह सापडला
www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली

अंतराळात पृथ्वीसारखा दुसरा ग्रह नाही, असं म्हटलं जात होतं. मात्र, याला आता अपवाद आहे, हे स्पष्ट झालं आहे. पृथ्वीपेक्षा आकारमानाने मोठा ग्रहाचा शोध लागला आहे. हा ग्रह पृथ्वीचा मोठा भाऊ असल्याचे सांगितले जात आहे.

हा ग्रहाचे नाव आहे KOI-314C. या ग्रहाकडे पाहिले असता तो पृथ्वीचा मोठा भाऊच वाटते. या ग्रहाचा आकार पृथ्वीपेक्षा मोठा आहे. पृथ्वीपासून २०० प्रकाश वर्ष दूर पृथ्वीप्रमाणे हिलिअम आणि हायड्रोजन यांची चादर लपटलेल्या असवस्थेत हा ग्रह शास्त्रज्ञांनी शोधून काढला आहे.

अमेरिकन शास्त्रज्ञांनी पृथ्वीप्रमाणे द्रव्यमान असणारा ग्रहचा शोध लावला आहे. त्यामुळे पृथ्वीसारख्या अन्य ग्रहांना शोधण्यासाठी अधिक बळ मिळाले आहे. ग्रहांचा अभ्यास करणाऱ्यांनी या ग्रहाचे नाव KOI-314C असे ठेवले आहे. या ग्रहाचा व्यास पृथ्वीपेक्षा ६० टक्के मोठा आहे.

हा ग्रह अत्यंत घन स्वरूपात आहे. गॅस वायुमंडळ स्वरूपात तो आहे. हावर्ड-स्मिथसोनियन सेंटर फॉर एस्ट्रोफीजिक्स (सीएफए)च्या डेविड किप्पिंग यांनी म्हटले आहे की, या नवीन ग्रहाचे द्रव्यमान पृथ्वीबरोबर आहे. मात्र, निश्चित स्वरूपात पृथ्वीप्रमाणे नाही.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, January 7, 2014, 23:01


comments powered by Disqus