अब एलियन दूर नही... , Earth to contact aliens in 12 years?

अब `एलियन` दूर नही...

अब `एलियन` दूर नही...
www.24taas.com, लंडन

पुढच्या १२ वर्षांच्या आतमध्ये मानव परग्रहवासियांच्या संपर्कात येणार आहे, असा दावा केलाय ब्रिटनच्या सुरक्षा मंत्रालयाच्या ‘यूएफओ’ (अन आयडेन्टीफाईड ऑब्जेक्ट) योजनेच्या एका माजी अधिकाऱ्यानं...

‘डेली एक्सप्रेस’ या बातमीपत्रानं दिलेल्या माहितीनुसार ‘यूएफओ’ योजनेचे प्रमुख निक पोप यांनी हा दावा केलाय. ‘स्क्वेअर किलोमीटर एरे` (एसकेए) नावाच्या का दुर्बिणीमध्ये आणखी विकास घडवून आणून त्याच्या साहाय्यानं ब्रम्हांडात पृथ्वीशिवाय आणखी कुठे जीवन आहे किंवा नाही याबाबत ठोस माहिती मिळवली जावू शकणार आहे’ असा निक पोप यांचा विश्वास आहे.

पोप यांनी मंत्रालयात गेली २१ वर्ष ‘यूएफओ’च्या कार्याचा आढावा घेतलाय. मी एक वादग्रस्त विधान करणार आहे... असं म्हणत पोप यांनी आपल्या माहितीला सुरुवात केली. ‘मी तुम्हाला परग्रहावरच्या लोकांशी संपर्क नेमका कधी होऊ शकेल याबाबतीत मी एक निश्चित वर्ष सांगू शकतो. ते वर्ष असेल २०२४... जर सगळ्या नियोजित योजना योग्य रितीनं पार पडल्या तर त्याच वर्षी एसकेए दुर्बिण काम करणं सुरू करेल’, असा दावा निक पोप यांनी केलाय.

‘एसकेए’चं काम २०१६ मध्ये सुरू होणार आहे. हे जगातलं सर्वांत मोठं रेडिओ दुर्बिण ठरु शकतं. या दुर्बिणीचे हजारो रिसेप्टर्स ऑस्ट्रेलियामध्ये पाच हजार किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळात पसरविले जाणार आहेत. वैज्ञानिकांच्या मते एसकेए इतर दुर्बिणींपेक्षा ५० टक्के अधिक संवेदनशील असणार आहे आणि १० हजार पटीच्या वेगानं ते आकाशाचं सर्वेक्षण करू शकतील. पोप यांच्या मते १०० प्रकाशवर्ष दूरही एखादी सभ्यता अस्तित्वात असेल तरीही या दुर्बिणीच्या साहाय्यानं तिचा ठावठिकाणा माहिती पडू शकेल.

First Published: Thursday, December 27, 2012, 12:00


comments powered by Disqus