चिलीत ८ रिश्टर स्केल भूकंप, earthquake in chile tsunami warning spurs evacuation of coastline

चिलीला ८ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का

चिलीला ८ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का
www.24taas.com, झी मीडिया, पेरु

चिलीला भूकंपाचे तीव्र धक्के बसलेत. ८ रिश्टर स्केल एवढी भूकंपाची तीव्रता होती... पेरू, इक्वेडोर, चिलीला त्सुनामीचा धोका असल्याचं सांगण्यात आलंय. मात्र चिली प्रशासनानं कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं सांगितलंय.

या तीव्र भूकंपामुळे समुद्रात ६.५ फुट उंचीच्या लाटा होत्या. त्यामुळे समुद्रातील पाण्यात वाढ होण्याचा धोका असून सुनामी येण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे समुद्र किनारी भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्याचे सांगण्यात आले आहे.

चिलीतील भूकंपानंतर शेजारील देशांना इशारा देण्यात आला असून हाई अलर्ट जारी करण्यात आले आहे. काही ठिकाणी भूकंपनाची रिश्टर स्केलवर तीव्रता ८.२ नोंदविली गेली. आणखी भूकंपाचे धक्के जाणविण्याची शक्यता आहे. या भूकंपामुळे घबराट परसली आहे.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, April 2, 2014, 08:14


comments powered by Disqus