सावधान, फेसबुकवरील सुंदर स्त्री आहेत`दहशतवादी`, fake facebook account

सावधान, फेसबुकवरील सुंदर स्त्री आहेत`दहशतवादी`

सावधान, फेसबुकवरील सुंदर स्त्री आहेत`दहशतवादी`
www.24taas.com, कॅनबेरा

फेसबुकवरील एखाद्या छानश्या मुलींचा फोटो असला की साहजिकच तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवितो. पण जरा सावध व्हा. फेसबुकवर बनावट प्रोफाईल बनवून त्‍यावर सुंदर महिलांचा फोटो अपलोड करण्‍यात येतो. त्याद्वारे हेरगिरीचा फंडा शोधण्यात आला आहे.

ही बाब ऑस्ट्रेलियन सरकारच्या लक्षात आली असून त्यांनी प्रशासनाला सोशल मीडियातील बनावट अकाउंटवर नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. विशेषत: मीडिया व संरक्षण विभागाने अशा अकाउंटचा आढावा घेऊन सतर्क राहण्यास सांगितले आहे.

तालिबानी दहशतवादी बनावट प्रोफाईलद्वारे सैनिकांसोबत मैत्री करतात आणि गोपनीय माहिती प्राप्‍त करतात. प्रोफाईलमध्‍ये सुंदर मुलीचे छायाचित्र असते. हा प्रकार उघडकीस आल्‍यानंतर सैनिकांना सावध राहण्‍याचा इशारा दिला आहे.

First Published: Tuesday, September 11, 2012, 16:41


comments powered by Disqus