मटण म्हणून खायला घालत उंदरांचं मांस! Fake mutton in China

मटण म्हणून खायला घालत उंदरांचं मांस!

मटण म्हणून खायला घालत उंदरांचं मांस!
www.24taas.com, झी मीडिया, बीजिंग

चीनमध्ये खाद्यसुरक्षा विभागाने एका अशा टोळीला अटक केली, जी मटणाच्या नावाखाली उंदरांचं मांस विकत असे. उंदिर आणि इतर लहान जनावरांचं मांस विकून या टोळीने लाखो डॉलर्स कमावले होते.

जन सुरक्षा मंत्रालयाने आपल्या वेबसाइटवर या संदर्भात माहिती दिली आहे. जानेवारीपासून ९०४ संशयितांना या आरोपाखाली अटक करण्यात आलं आहे. उंदरांचं मांस हे लोक मटणाचे तुकडे म्हणून विकत असत. चीनमध्ये बर्ड फ्लूची साथ पसरल्यानंतर लोकांनी चिकन खाणं बंद केलं होतं. चिकन विक्री ८० % कमी झाली होती. परिणामी, मटणाची मागणी वाढली होती. मात्र काही टोळअया उंदरांचं मांस मटण म्हणून विकत असत. पोलिसांनी आत्तापर्यंत २० हजार टनांहूनही अधिक नकली मटण जप्त केलं आहे.

मंत्रालयाकडून आलेल्या माहितीवर वाचकांच्या कडवट प्रतिक्रिया आल्या आहेत. उंदरांचं मांस खाणं हे विषारी असल्याचं काहीजणांचं म्हणणं आहे. त्यामुळे अनेकांना शारीरिक व्याधी झाल्याचंही सांगण्यात येत आहे.

First Published: Saturday, May 4, 2013, 16:07


comments powered by Disqus