३०० फुटांवरून तो दरीत कोसळला... तरीही जिवंत!, fall from 300 ft... but alive!

३०० फुटांवरून तो दरीत कोसळला... तरीही जिवंत!

३०० फुटांवरून तो दरीत कोसळला... तरीही जिवंत!

www.24taas.com, झी मीडिया, पालोस वर्डेस इस्टेट्स (अमेरिका)

दक्षिण कॅलिफोर्नियात एक अजब-गजब किस्सा घडलाय. दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये समुद्राला लागून असलेल्या एका डोंगरावरून एक व्यक्ती तब्बल ३०० फुटांवरून कोसळूनही जिवंत परत आला.

‘केएनबीसी’ टीव्हीनं दिलेल्या माहितीनुसार, एका १९ वर्षीय तरुणाला गंभीर अवस्थेत हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं. स्थानिक वेळेनुसार, रात्री दोन वाजल्याच्या सुमारास काही अधिकारी घटनास्थळावर पोहचले होते. तिथं त्यांना एक गाडी समुद्राच्या लाटांवर हेलकावे खात असलेल्या अवस्थेत दिसली. अग्निशमन दल आणि बचाव दलाच्या सदस्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीनं ही गाडी आणि या गाडीचा ड्रायव्हर असलेल्या एका तरुणाला सुखरुप बाहेर काढलं. त्यानंतर त्यांनी या तरुणाला हॉस्पीटलमध्ये दाखल केलं.

आपण, जाणून-बुजून या उंच डोंगरावरून गाडी चालवत होतो, अशी कबुली या तरुणानं यानंतर पोलिसांसमोर दिलीय. पण, तब्बल ३०० फुटांवरून खाली समुद्रात कोसळलेला हा तरुण वाचल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, December 29, 2013, 13:40


comments powered by Disqus