बापाने मुलीवर केला बलात्कार, मुलीने केला त्याचा शिरच्छेद! Father rapes daughter, daughter beheads him

बापाने मुलीवर केला बलात्कार, मुलीने केला त्याचा शिरच्छेद!

बापाने मुलीवर केला बलात्कार, मुलीने केला त्याचा शिरच्छेद!
www.24taas.com, झी मीडिया, न्यू गिनी

आदिवासी पाड्यामध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. पित्यानेच रात्रभर मुलीवर बलात्कार केल्यानंतर सकाळी मुलीने वडिलांचा शिरच्छेद केला. १८ वर्षांच्या या मुलीने आपल्या कुटुंबाला या संदर्भात माहिती दिली.

या मुलीच्या कुटुंबातील आई आणि दोन भाऊ हे नातेवाईकांकडे गेले होते. यावेळी घरात वडिल आणि मुलगीच होते. त्यावेळी ४५ वर्षीय बापाने आपल्या मुलीवर बलात्कार केला. रात्रभर मुलीवर बलात्कार केल्यानंतर जेव्हा सकाळीही बाप मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करू लागला, तेव्हा मुलीने संतापाने वडिलांचा गळा कापला. आई आणि भावंडं घरी आल्यावर तिने या घटनेबद्दल संपूर्ण समुदायाला माहिती दिली.

मुख्य म्हणजे समुदायाने मुलीचं समर्थन केलं आहे. मुलीचं कृत्य योग्य मानून तिला पोलिसांच्या ताब्यात न देण्याचा निर्णय समुदायाने घेतला आहे. यापुढे पोलिसांपासून तिचं संरक्षण करण्यासाठी काही माणसंही नेमली आहेत. या मुलीवर बहिष्कार न टाकता तिला सन्मानाने वागवण्यात येईल, असं समुदायाने स्पष्ट केलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, June 17, 2013, 21:25


comments powered by Disqus