Last Updated: Friday, December 14, 2012, 13:07
www.24taas.com, पोर्ट एलिझाबेथ, द. आफ्रिकाशालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांचा एक अनोखा कारनामा उघड झालाय. दक्षिण आफ्रिकेतल्या सफारीत रक्तबंबाळ प्राण्यांसोबत फौजिया खान यांनी फोटो काढल्याचं उघड झालय.
विशेष म्हणजे हे फोटो एका वेबसाईटवर टाकण्यात आलेत. फौजिया खान या शालेय शिक्षण राज्यमंत्री आहेत. अशाप्रकारे रक्तबंबाळ प्राण्यांसोबत फोटोसेशन केल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
परदेशात फौजिया खान भारताच्या कोणत्या प्रतिमेचं प्रदर्शन करत होत्या हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय.
First Published: Friday, December 14, 2012, 12:00