भारतीय विद्यार्थ्याने दाखवली चूक, सव्वा आठ लाख देणार फेसबुक!, FB awards an Indian student

भारतीय विद्यार्थ्याने दाखवली चूक, सव्वा आठ लाख देणार फेसबुक!

भारतीय विद्यार्थ्याने दाखवली चूक, सव्वा आठ लाख देणार फेसबुक!
www.24taas.com, झी मीडिया, चेन्नई

एका भारतीय विद्यार्थ्याने फेसबुकला चूक लक्षात आणून दिली आहे. फेसबुकवर कोणीही कोणाच्या खात्यावरील छायाचित्र काढून टाकू शकतो, हे भारतीय विद्यार्थ्याने सिद्ध करून दाखविले आहे. त्यामुळे फेसबुकने या विद्यार्थ्याला आठ लाख 25 हजार रुपयांचे बक्षीस देण्याचा निर्णय घेतला आहे.

एकवीस वर्षीय अरुल कुमार या विद्यार्थ्याने फेसबुकवरील कोणतेही छायाचित्र काढून टाकता येते, असे फेसबुकला कळविले होते. पण अरुल कुमार याचा दावा फेसबुकने फेटाळला होता. अरुल कुमारने फेसबुकचा संस्थापक झुकेरबर्ग यांच्या प्रोफाईलवरील एक छायाचित्र काढून टाकले व त्याचा व्हिडिओ झुकेरबर्ग यालाच पाठविला.

हा व्हिडिओ फेसबुकच्या इंजिनियर्सनी पाहिल्यावर त्यांनी आपली चूक मान्य केली आहे. जानेवारीमध्ये लॅपटॉप खरेदी केल्यानंतर इंटरनेटवर काम करताना अरुलच्या ही चूक लक्षात आली होती. अरुल कुमार याच्या संशोधनाबद्दल फेसबुकने त्याला आठ लाख 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

अरुल कुमार स्वतः इंजिनियक किंवा सॉफ्टवेअर क्षेत्रातला नाही. इलेक्ट्रॉ निक ऍण्ड कम्युनिकेशनमध्ये त्याने शिक्षण घेतले असून सध्या तो चेन्नईमध्ये नोकरी शोधत आहे. तमिळनाडूमध्ये एका छोट्याशा गावामध्ये त्याच्या वडिलांची टपरी आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. फेसबुककडून मिळणाऱ्या रकमेचा वापर कुटुंबासाठी करणार असल्याचे अरुल कुमारने सांगितले.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, September 3, 2013, 22:48


comments powered by Disqus