Last Updated: Tuesday, January 7, 2014, 12:15
www.24taas.com, झी मीडिया, न्यूयॉर्कअमेरिकेच्या केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हची सूत्र शंभर वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा एका महिलेच्या हाती येणार आहेत, अमेरिकेच्या सिनेटने जेनेट येलेन यांची फेडरल रिझर्व्हच्या प्रमुखपदी निवड झाल्याचं स्पष्ट केलं आहे.
येलेन या फेडरल बँकेचे सध्याचे प्रमुख बेव बर्नांके यांची जागा घेणार आहेत, बर्नांके १ फेब्रुवारी रोजी निवृत्त होणार आहेत.
अमेरिकन सिनेटमधील ५० सदस्यांनी येलेन यांच्या बाजूने मतं दिली, तर २६ मतं विरोधत होती, अमेरिकेत थंडीचा कडाका वाढलाय, वातावरण खराब असल्याने काही सदस्य मतदान करायला पोहचू शकले नाहीत. अमेरिकन राष्ट्रपती बराक ओबामा यांनी प्रतिक्रिया देतांना म्हटलं आहे.
अमेरिकन जनतेला एक असा चॅम्पियन मिळेल, जो यातील सार ओळखतो, आर्थिक आणि वित्तीय निती ठरवून अमेरिकन कामगार आणि त्यांच्या परिवाराच जीवन अधिक सुखदायी करण्याचं लक्ष असल्याचं बराक ओबामा यांनी म्हटलं आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, January 7, 2014, 12:14