फिलिपिन्स २ जहाजांची धडक, ३१ ठार, Ferry sinks after collision off Philippines; 31 dead, over 170 unaccounted

फिलिपिन्स २ जहाजांची धडक, ३१ ठार

फिलिपिन्स २ जहाजांची धडक, ३१ ठार
www.24taas.com, झी मीडिया, कार्गो
फिलिपिन्समध्ये एका कार्गो जहाजाला थॉमस एक्विनास नावाच्या प्रवासी जहाजाने धडक दिली. या अपघातात तब्बल ३१ लोकांचा मृत्यू झाला असून 300 लोकांचा शोध सुरु आहे.

या जहाजावर तब्बल 870 प्रवासी प्रवास करत होते. समुद्रात उभ्या सल्पिसीओ एक्सप्रेस या कार्गो जहाजाला थॉमस एक्विनासने टक्कर दिली. लोकांना वाचवण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सरसावली असून आतापर्यंत 572 लोकांना वाचवण्यात यश आलय.

उपचारासाठी त्यांना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलय... शोध कार्यात हेलिकॉप्टर आणि दुस-या बोटींची मदत घेतली जात आहे असून अपघात नेमका का घडला याबाबत अजून स्पष्टिकरण देण्यात आलेलं नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, August 17, 2013, 22:48


comments powered by Disqus