Last Updated: Monday, December 23, 2013, 09:20
www.24taas.com, वृत्तसंस्था, लंडन जगात पहिल्यांदाच फ्रान्समध्ये एका ७५ वर्षीय पुरुषावर यशस्वीपणे कृत्रिम हृदयरोपण शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टरांना यश आलंय. या शस्त्रक्रियेमुळं या वयोवृद्ध रुग्णाचं आयुष्य पाच वर्षांनी वाढविण्यात डॉक्टरांना यश मिळालं.
फ्रान्सच्या जैव-तंत्रज्ञान फर्म कॅरमॅटच्यावतीनं हे कृत्रिम हृदय बसविण्यात आलं असून ते लिथियम बॅटरीवर चालतं. शरीर त्यास प्रतिकार करू नये म्हणून प्राण्यांच्या पेशी, चरबी अशा खास बायोमटेरियल पदार्थांचा वापर करून हे कृत्रिम हृदय पॅरिसच्या जॉर्ज पॉम्पीडाऊ रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करून रुग्णाच्या शरीरात बसविण्यात आलं.
यापूर्वी कृत्रिम हृदयरोपण शस्त्रक्रिया तात्पुरत्या स्वरूपाची करण्यात आली होती. आता पहिल्यांदाच खरं हृदय बदलून कृत्रिम हृदय बसवून रुग्णाचं आयुष्य वाढविण्यात डॉक्टरांना यश आलंय. या हृदयाचं वजन किलोग्रॅमपेक्षाही कमी असून मानवी हृदयापेक्षा त्याचं वजन तीनपट अधिक आहे.
डचमधील युरोपियन अॅरोनॉटिक डिफेन्स अॅण्ड स्पेस कंपनीनं हे कृत्रिम हृदय तयार केलं असून ते बसविल्यानंतर पेशंट त्यास चांगला प्रतिसाद देत असल्याचं डॉक्टरांनी ‘दि टेलिग्राफ’शी बोलताना स्पष्ट केलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, December 23, 2013, 09:20