Last Updated: Tuesday, June 25, 2013, 16:08
www.24taas.com, झी मीडिया, इटलीइटलीचे माजी पंतप्रधान सिल्व्हियो बर्लुस्कोनी यांनी अल्पवयीन डान्सरसोबत केलेली बुंगा बुगा सेक्स पार्टी त्यांना चांगलीच महागात पडली आहे. बर्लुस्कोनी यांना ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
इटलीचे माजी पंतप्रधान सिल्व्हियो बर्लुस्कोनी हे आपल्या अय्याशीबद्दल बदनाम आहेत. बुंगा बुंगा सेक्स पार्टीमध्ये ७५ वर्षीय माजी पंतप्रधानांनी १७ वर्षांच्या अल्पवयीन डान्सर रुबीसोबत शरीरसंबंध ठेवला. याबद्दल आणि हे प्रकरण आपल्या पदाचा गैरवापर करत दडपण्याचा प्रयत्न केल्याबद्दल बर्लुस्कोनी यांच्यावर खटला चालवण्यात आला. खटल्यादरम्यान आपण अल्पवयीन रुबीसोबत सेक्स केला नसल्याचा दावा बर्लुस्कोनी त्यांनी केला. मात्र त्यांच्यावरील गुन्हा सिद्ध झाला आहे.
इटालियन कोर्टाने याबद्दल बर्लुस्कोनी यांना ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा फर्मावण्यात आली आहे. तसंच आपल्या पदांचा गैरवापर करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांच्या सर्व सार्वजनिक पदांवर आजीवन बंदी घालण्यात आली आहे. सर्व प्रकरणांची सुनावणी झाल्यानंतर बर्लुस्कोनी यांना ही शिक्षा होईल.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, June 25, 2013, 16:08