माजी `मिस व्हेनेझुएला`ची मुलीसमोर क्रूर हत्या, Former Miss Venezuela Monica Spear shot dead in front

माजी `मिस व्हेनेझुएला`ची मुलीसमोर क्रूर हत्या

माजी `मिस व्हेनेझुएला`ची मुलीसमोर क्रूर हत्या

www.24taas.com, झी मीडिया, कराकस

माजी मिस व्हेनेझुएला मोनिका स्पीयर आणि तिचा ब्रिटन पती थॉमस बेरी यांची त्यांच्याच कारमध्ये क्रूर पद्धतीनं गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय. मोनिका आणि थॉमस यांच्या पाच वर्षांच्या मुलीच्या उघड्या डोळ्यांसमोर या दोघांची हत्या झालीय.

या हल्ल्यात मोनिकाची पाच वर्षांची मुलगी माया गंभीररित्या जखमी झालीय. तिच्या पायावर गोळी लागलीय. तिला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, तिची तब्येत सध्या स्थिर आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.

मोनिका स्पीयर हिनं २००४ स्ली मिस व्हेनेझुएलाचा ताज पटकावला होता. तिनं काही टीव्ही मालिकांमध्येही काम केलं होतं. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, दरोडेखोरांनी दरोड्याच्या प्रयत्नात या दोघांची हत्या केलीय.

मोनिका आणि तिचा पती मेरिडा शहरातून राजधानी काराकसकडे जात होते. यावेळी मध्येच त्यांच्या कारखाली काही धातूचे तुकडे आले आणि गाडीचे दोन टायर पंक्चर झाले. यावेळी पाच जणांनी त्यांना घेरुन थांबण्यास सांगितलं. तेव्हा हे दोघे आणि त्यांची मुलगी गाडीच्या मागच्या भागात लपून बसले. परंतु या टोळक्यानं त्यांच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडल्या.

स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनिका आणि तिच्या पतीनं जागीच अखेरचा श्वास घेतला पण, त्यांची पाच वर्षांच्या चिमुरडीला मात्र जवळजवळ ४५ मिनिटांपर्यंत ब्रेकडाऊन मदतीसाठी वाट पाहावी लागली.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, January 8, 2014, 12:39


comments powered by Disqus