Last Updated: Friday, October 26, 2012, 11:14
www.24taas.com, पॅरीसकाही दिवसांपूर्वीच इंग्लंडचा प्रिंस हॅरी याचे नग्न फोटोग्राफ प्रकाशित झाल्यामुळे युरोपात मोठा गहजब उडाला होता. तसंच काहीसं आता फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष फ्रांसोइस हॉलांड यांची प्रेयसी वलेरी ट्रिरव्हेलियर यांचा बिकिनीमधील फोटो प्रकाशित केल्याबद्दल फ्रांसमधील तीन नियतकालिकांना दंड भरावा लागणार आहे.
फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष फ्रांसोइस हॉलांड आणि त्यांची प्रेयसी वलेरी ट्रिरव्हेलियर हे उन्हाळ्याच्या सुट्टीत एका बेटावर अर्धनग्न अवस्थेत होते. यावेळी वलेरी यांनी टू पीस बिकिनी घातली होती. यावेळी आपल्या खासगी गोष्टी गुप्तचराहाव्यात यासाठी त्यांनी २०,००० ते २५,००० युरो खर्च केला होता. मात्र तरीही काही मासिकांना वलेरी यांचे अर्धनग्न अवस्थेत फोटो काढले.
फ्रांसमधील उच्च न्यायालयाने याबद्दल तिन्ही मासिकांना प्रत्येकी २००० युरो इतक दंड भरण्याची शिक्षा ठोठावली आहे. यातील ‘फ्रेंच ग्लोसी’ या मासिकाने यापूर्वी प्रिंस विल्यम यांची पत्नी कॅथरिन हिचे नग्नावस्थेत सूर्यस्नान घेत असतानाचे फोटोग्राफ काढले होते. यासाठी ‘फ्रेंच ग्लॉसी’वर बंदीही घातली गेली होती. मात्र उच्च न्यायालयाने ‘वलेरी यांनी सार्वजनिक ठिकाणी अर्धनग्न अवस्थेत बसून गुप्ततेची अपेक्षा बाळगणं चूक आहे’ अशी फ्रांसच्या प्रथम महिलेची कानउघाडणीही केली आहे
First Published: Wednesday, October 24, 2012, 13:33