समलैंगिक फुटबॉल तरूणीवर सामूहिक बलात्कार, ganag rape on girl in south africa

समलैंगिक फुटबॉलपटू तरूणीवर सामूहिक बलात्कार

समलैंगिक फुटबॉलपटू तरूणीवर सामूहिक बलात्कार
www.24taas.com, झी मीडिया, जोहान्सबर्ग

दक्षिण आफ्रिकेत समलैंगिक असल्याने फुटबॉलपटू तरुणीवर, चार नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एवढंच नाही तर बलात्कार केल्यानंतर या तरूणांनी तिला धमकीही दिलीय.

`बलात्कारानंतर तू पुन्हा मुलांसोबतच शरीरसंबंध ठेवशील ` अशी धमकी देण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेत या बलात्काराचा मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात येत आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या स्थानिक मीडियात आलेल्या बातम्यांनुसार जोहान्सबर्ग भागात ही घटना घडली. फुटबॉल खेळून ही तरूणी घरी परतत असतांना , चार जणांनी तिला स्टेडियमजवळच घेरलं, स्टेडियमच्या मागच्या बाजूला निर्जनस्थळी नेत तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

तिला बलात्कारानंतर मारहाण करण्यात आली आणि बेशुद्धावस्थेत सोडून हे तरूण निघून गेले. यानंतर काही लोकांनी या तरूणीला उपचारासाठी रूग्णालयात दाखले केले.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, January 6, 2014, 11:43


comments powered by Disqus