पंचायतीचं फर्मान; ३० जणांचा विधवेवर बलात्कार, gangrape in islamabad, after panchayat verdict

पंचायतीचं फर्मान; ३० जणांचा विधवेवर बलात्कार

पंचायतीचं फर्मान; ३० जणांचा विधवेवर बलात्कार

www.24taas.com, झी मीडिया, इस्लामाबाद

पाकिस्तानातील पंजाब प्रांतात भावाचं प्रेम चुकीचं ठरवतं त्याच्या या चुकीची शिक्षा त्याच्या विधवा बहिणीला दिली गेली... आणि ही शिक्षा होती, ३० जणांचा तिच्यावर सामूहिक बलात्कार...

गुरुवारी, ही धक्कादायक घटना उघडकीस आलीय. पीडित महिला, लाहोरपासून साडे तीनशे किलोमीटर दूर मुजफ्फरगडमध्ये राहते. ३० वर्षीय पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, तिच्या भावाचं शेजारच्या गावात राहणाऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. पंचायतीच्या म्हणण्यानुसार तिच्या भावानं दुसऱ्या कुटुंबातील एका मुलीला अपमानित केलंय... आणि तिला न्याय देण्यासाठी पीडित महिलेला अपमानित करण्याची शिक्षा त्यांनी सुनावली.

पोलिसांनी मात्र, बलात्काराच्या आरोपावर अद्याप शिक्कामोर्तब केलेलं नाही. मेडिकल रिपोर्ट येत नाही तोपर्यंत बलात्कार झाला असं म्हणता येणार नाही, असं पोलिसांनी म्हटलंय. या प्रकरणात पंचायतीच्या अध्यक्षासोबत आणखी दोघांना अटक करण्यात आलीय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, January 31, 2014, 11:49


comments powered by Disqus