जिलानी अमेरिकेत पाकिस्तानचे नवे राजदूत, Gilani, Pakistan`s new ambassador to the U.S.

जिलानी अमेरिकेत पाकिस्तानचे नवे राजदूत

 जिलानी अमेरिकेत पाकिस्तानचे नवे राजदूत
www.24taas.com, वृत्तसंस्था, इस्लामाबाद

अमेरिकेतील पाकिस्तानचे नवे राजदूत म्हणून जलील अब्बास जिलानी यांची नियुक्ती केली गेली आहे. जिलानी यांच्याकडे याआधी परराष्ट्र सचिव पदाची जबाबदारी होती.

जिलानी यांचा अमेरिकेत पाकचे राजदूत म्हणून निवड करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. डिसेंबरपासून ते आपला पदभार स्वीकारतील, अशी माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली.

जिलानी यांची राजनैतिक अधिकारी म्हणून ओळख आहे. त्यांनी आतापर्यंत पाकिस्तानचे राजदूत म्हणून बेल्जियम, युरोपियन युनियनमध्ये काम पाहिले आहे.

१९९० ते १९९२ या काळात त्यांनी पंतप्रधानांचे उपसचिव म्हणून काम पाहिले आहे. तसेच त्यांना राजनैतिक अधिकारी म्हणून जेद्दाह, लंडन, वॉशिंग्टन, कॅनबेरा येथेही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, November 9, 2013, 17:17


comments powered by Disqus