Last Updated: Tuesday, April 22, 2014, 12:36
www.24taas.com, झी मीडिया, न्यूयॉर्कअमेरिकेतील एक धक्कादायक घटना. अवघ्या 3 वर्षांच्या मुलीकडून चुकून बंदुकीची गोळी सुटली. या सुटलेल्या गोळीने तिच्याच दोन वर्षांच्या भावाचा जीव घेतला. या दुर्दैवी घटनेने कुटुंबीयांना धक्का बसलाय. ही घटना उताहमधील काचे काउंटीमध्ये घडली.
२२ कॅलिबरची रायफल घराच्या दिवाणखान्यात ठेवण्यात आली होती. मुलीने या रायफलची ट्रीगर दाबल्यामुळे सुटलेली गोळी मुलाच्या पोटात घुसली. गोळीबाराचा आवाज ऐकू आल्यानंतर मुलाच्या आईने मदतीसाठी आरडाओरडा केला. जखमी मुलाला तातडीने लोगन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, अधिक उपचारासाठी हेलिकॉप्टरने प्रायमरी चिल्ड्रन्स हॉस्पिटल येथे हलविण्यात आले होते. मात्र, याचा काहीही उपयोग झाला नाही.
दरम्यान, अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. मुलांकडून गोळीबार होण्याची अमेरिकेतील ही चौथी घटना आहे. अशाच आणखी एका दक्षिण कॅरोलिनात घटनेत एक महिला ठार झाली. सहा वर्षांच्या एका मुलाने कारमध्ये सापडलेली बंदूक चालविल्याने या महिलेचा जीव गेला.
मुलाचे वडील कार चालवत होते तर अलेक्झांड्रा अनिता सान्टोस (२२) ही महिला कारच्या समोरील सीटवर बसलेली होती. मुलगा मागील सीटवर होता. तो बंदुकीशी खेळत असताना गोळी सुटली आणि सीटद्वारे समोरील महिलेचा वेध घेतला. तर फिलाडेल्फियात या महिन्याच्या सुरुवातीला एका पाच वर्षीय मुलाकडून अपघाताने झालेल्या गोळीबारात एक ११ वर्षीय मुलीला प्राण गमवावे लागले होते.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, April 22, 2014, 12:36