Last Updated: Friday, October 19, 2012, 19:47
www.24taas.com,लाहोरपाकिस्तानमध्ये निकाह करण्यासाठी प्रियकराने कबुल कबुल म्हणण्यास नकार दिल्याने प्रेयसीनेच बंदूक घेवून प्रियकराचा समाचार घेतला. तिने केलेल्या अंदाधुंद गोळीबारामुळे प्रियकरासह अनेक जण गंभीर जखमी झालेत.
गेली दोन वर्षे प्रेम असणाऱ्या प्रेयसीने प्रियकराने लग्नास नकार दिल्यानंतर चिडून प्रेयसीने त्याच्या मित्रांवर अंदाधूंदपणे गोळीबार केला. या घटनेत तिघे जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अशिया (२०) आणि मोहम्मद फैसल (२२) यांचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध जुळले होते. मात्र, अशियाने लग्नाबाबत विचारल्यापासून मोहम्मद तिला टाळू लागला होता. त्यानंतर त्याने दुसऱ्या युवतीशी लग्न करण्याचे ठरविले होते. याबाबतची माहिती अशिया हिला समजल्यानंतर ती संतप्त झाली होती.
अशिया गुरुवारी घरातून बंदूक घेऊन मोहम्मद काम करत असलेल्या ठिकाणी गेली. मोहम्मद व त्याच्या मित्रांवर तिने बेछुट गोळीबार केला. यात तिघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
First Published: Friday, October 19, 2012, 19:47