Last Updated: Saturday, May 10, 2014, 14:16
www.24taas.com, झी मीडिया, टोकियोटक्कल पडलेल्या लोकांसाठी खुशशबर टोकियो टक्कल असलेल्या लोकांसाठी रेस्टॉरंटच्या बिलात सुट दिली जाणार आहे. अकासका येथील एक रेस्टोरेंटने ही सूट दिली आहे.
रेस्टोरेंटचे अधिकारी याशिको टोयोडा यांनी म्हटलंय की, टक्कल पडल्याने अनेक जण सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळतात.
टक्कल पडलेल्या लोकांमध्ये आत्मविश्वास वाढवण्याचा हा प्रयत्न आहे. टक्कल पडलेल्या ग्राहकांना 500 येनची सूट देण्यात आली आहे.
इतर देशांप्रमाणे जपानमध्ये टक्कल हा एक संवेदनशील मुद्दा आहे. मात्र हॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींना टक्कल आहे, तरी त्यांना सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये असं वाटत नाही, उलट ते अधिक उत्साही राहून जीवन जगतात.
हेअरपीस बनवणारी कंपनी एडरांसच्या माहितीनुसार जपानमध्ये टक्कल पडण्याचं प्रमाण इतर देशांच्या तुलनेत 26 टक्के आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, May 10, 2014, 14:16