मंगळावर वाहत होती नदी!, Gorgeous Images: Ancient River on Mars?

मंगळावर वाहत होती नदी!

मंगळावर वाहत होती नदी!

www.24taas.com, लंडन
मंगळ ग्रहावर एकेकाळी १,५00 किमी लांब आणि सात किमी रुंदीची महाकाय नदी वाहन होती, असे दर्शविणारी विस्मयकारी छायाचित्रे गेल्या शुक्रवारी ‘युरोपियन स्पेस एजन्सी’च्या (ईएसए) ‘मार्स एक्स्प्रेस’ या यानाने पाठविली आहेत. एजन्सीने पाठविलेले हे यान मंगळाच्या सतत प्रदक्षिणा करीत असते.

‘मार्स एक्सप्रेस’वरील हाय रेसोल्युशन स्टिरिओ कॅमेर्यायने टिपलेल्या या छायाचित्रांमध्ये मंगळावरील ‘रेयुल वॅलिस’ भागात एकेकाळी तेथे वाहलेल्या नदीचे अवशेष स्पषट दिसतात. ही नदी त्या ठिकाणी हेस्पेरियन कालखंडात म्हणजे ३.५ अब्ज ते १.६ अब्ज वर्षांपूर्वी वाहत असावी, असा अंदाज करता येतो, असे ’ईएसए’ने एका निवेदनात म्हटले आहे.

अतिप्राचीन काळात मंगळावरील प्रोमेथेई पठारावरून वाहणार्याए या नदीच्या प्रवाहाने सरळ उभ्या भिंती असलेला खंदकासारखा पट्टा खोदला जाऊन ‘रेयुल वॅलिस’ तयार झाली असावी, असे मानले जाते.

या छायाचित्रांमध्ये ताशीव दगडांनी तयार झालेला हा नागमोडी पट्टा सुमारे १,५00 किमी लांबीपर्यंत दिसतो. त्याच्या दोन्ही बाजूंना मुख्य नदीच्या असंख्य उपनद्यांमुळे तयार झालले असेच छोटे चॅनेल्सही दिसतात.

‘रेयुल वॅलिस’च्या या छायाचित्रांमध्ये एके ठिकाणी हा खंदकासारखा चॅनेल सात किमी रुंद व ३00 मीटर खोलीचा असावा असे दिसते. ‘रेयुस वॅलिस’च्या बाजूच्या भिंती खास करून सरळ उभ्या ताशीव दगडांच्या आहेत. अशाच प्रकारची भूरचना चॅनेलच्या पृष्ठभागावरही दिसून येते.

हेस्पियन कालखंडात तेथे वाहणार्याअ द्रवरूप नदीच्या प्रवाहाने आधी भूस्तराचे स्खलन झाले आणि त्यानंतरच्या ‘अँमेझोनियन’ कालखंडात वाहलेले सुटे दगडगोटे आणि हिमनगांच्या घर्षणाने ही विलोभनीय भूरचना तयार झाली असावी, असे ग्रहीय भूवैज्ञानिकांना वाटते. या छायाचित्रांच्या वरच्या भागात प्रामुख्याने मंगळाच्या प्रोमेथई उच्चस्तरीय पठाराची व्याप्ती दिसते.

First Published: Monday, January 21, 2013, 17:06


comments powered by Disqus