Last Updated: Tuesday, February 4, 2014, 15:55
www.24taas.com, वृत्तसंस्था, अबुजा,नायजेरिया नायजेरियात एक धक्कादायक प्रकार घडलाय. अवघ्या १४ वर्षांच्या मुलाने स्वत:च्याच आजीचं अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या मुलाला काही वाईट मुलांची संगत लागली आणि पैशांसाठी त्यानं त्या मुलांसोबत आजीच्याच अपहरणाचा कट केला. त्या सर्वांनी मिळून त्या वृद्धेचं अपहरण तर केलंच आणि सुटकेसाठी चक्क १५ लाख रुपयांची खंडणी मागितली.
त्या वृद्धेच्या नातेवाईकांनी कसेबसे पैसे जमवून वृद्धेची सुटका केली. या कटात सहभागी असणाऱ्या त्या तरूणाला त्याच्या हिश्श्याचे ५० हजार रुपयेही मिळाले. मात्र पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी केली असता खुद्द नातवानंच आजीचं अपहरण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
त्यामुळं ज्या कोवळ्या वयात लहान मुलं निरागस जीवन जगतात, त्याच वयात काही जण मोठमोठे कारनामेही करतात. हे पुन्हा एकदा दिसून येतंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, February 4, 2014, 15:13