Last Updated: Sunday, August 19, 2012, 23:34
www.24taas.com, लंडनजगविख्यात ग्रेट ब्रिटनच्या राणीला कुशल ड्रायव्हरची आवश्यकता असून त्यासाठी ब्रिटनचे लायसन्स आणि व्यवहार निपुणता हवी, अशी अट आहे. ब्रिटनच्या राणीच्या वेबसाईटवर या पदाची जाहिरात देण्यात आली आहे.
महाराणीकडील रोल्सराईस ही आलीशान गाडी चालविण्याची संधी याखेरीज तब्बल २०,०१,०००रुपये वेतन ड्रायव्हरला मिळणार आहे. त्याला केवळ ४८ तासच काम करावे लागेल.
शिवाय राजवाड्यात मोफत राहण्याची सुविधा मिळणार आहे. मुख्य ड्रायव्हरच्या आदेशानुसार शाही परिवारातील सदस्यांना व पाहुण्यांची ने-आण करण्याचे काम या ड्रायव्हरला करावे लागेल.
First Published: Sunday, August 19, 2012, 23:34