अमेरिका नौदल मुख्यालयातील गोळीबारात १३ ठार ,Gunman among 13 killed in Washington Navy Yard shootings

अमेरिका नौदल मुख्यालयातील गोळीबारात १३ ठार

अमेरिका नौदल मुख्यालयातील गोळीबारात १३ ठार
www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन

अमेरिकेच्या नौदल मुख्यालयात गोळीबार झालाय. हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केल्यानं १३ जण ठार तर सात जण जखमी झालेत. २ हल्लेखोरांना पकडण्यात यश आलंय. तर एका हल्लेखोराला ठार मारण्यात यश आल्याचं वॉशिग्टंन पोस्टनं वृत्त दिलंय.

अमेरिकन वेळेनुसार सकाळी आठ वाजून २० मिनीटानी हा हल्ला झाला. या हल्ल्यापूर्वी बहुतेक सैनिक हे मुख्यालयात गेले होते. दोन हल्लेखोर अद्यापही दडून बसले आहेत. त्यांचा शोध सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या हल्ल्याचं नेमक कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही.

या हल्ल्यापूर्वी बहुतेक सैनिक हे मुख्यालयात गेले होते. दोन हल्लेखोर अद्यापही वॉशिंग्टन पोस्टमधील मुख्यालयात दडून बसले आहेत. त्यांचा शोध सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या हल्ल्याचं नेमक कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, September 17, 2013, 11:06


comments powered by Disqus