Last Updated: Monday, February 18, 2013, 17:48
www.24taas.com, इस्लामाबादलष्कर-ए-तोयबाचा प्रमुख आणि २६/११ मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याने पुन्हा एकदा भारताला चिथावलं आहे. हाफिझ सईदने ट्विटरवरून पुन्हा भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
बलुचचिस्तान आणि अफगाणिस्तान भागांमधून अमेरिकेने आपलं माघारी घेण्यास सुरूवात केली आहे. या घटनेचा संबंध काश्मीरशी जोडत सईदने ट्विट केलं आहे, की जशी अफगाणिस्तानातून अमेरिकेला माघार घ्यावी लागत आहे, तसंच काश्मीर खोऱ्यातून भारताला मागे हटावं लागणार आहे. अमेरिकेप्रमाणेच भारताचाही प्रभाव काश्मीरमधून संपणार आहे.
भारताला पाकिस्तानाशी युद्ध करायचं आहे आणि त्यासाठी भारत शस्त्रं जमवत आहे. पाकिस्तान आणि भारताचेही मुस्लिम एकत्र असल्याची भारताला भीती वाटत आहे. आणि अर्थातच जगभरातील मुस्लिम एकमेकांना साथ देणार आहेत आणि भारताचा पराभव होणार आहे. असं हाफिझ सईदने ट्विट केलं आहे.
First Published: Monday, February 18, 2013, 16:57