हाताच्या घामानंही लागते आत्महत्येचे विचारांची चाहूल, hand sweat can give signal of suicide

हाताच्या घामानंही लागते आत्महत्येचे विचारांची चाहूल

हाताच्या घामानंही लागते आत्महत्येचे विचारांची चाहूल

www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई

निराशेच्या आहारी गेलेली व्यक्ती आत्महत्या करू शकते का? हे आता त्या व्यक्तीच्या हाताला सुटणाऱ्या घामावरूनही कळू शकणार आहे... होय, शास्त्रज्ञांनी तशी टेस्ट शोधून काढलीय. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचे विचार घोळत असतील तर त्याबद्दल अगोदरपासून दुसऱ्या व्यक्ती अंदाजा घेऊ शकतात आणि अशा व्यक्तींना आत्महत्या करण्यापासून परावृत्त करू शकतात.

एखादी व्यक्ती निराश असेल, हताश असेल तर तो केव्हा टोकाचं पाऊल उचलून आपलं जीवन संपवेल हे सांगणं मानसोपचार तज्ज्ञांनाही कठिण ठरतं. पण, अशाच काही लोकांचा अभ्यास करून शास्त्रज्ञांनी ही नवीन पद्धत शोधून काढलीय. ही चाचणीद्वारे मिळणारा निकाल हा जवळजवळ ९७ टक्के योग्य असेल.

जर्मन आणि स्वीडीश शास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या या नवीन पद्धतीत केवळ रक्तदाब, रक्ताभिसरण आणि धर्मग्रंथी म्हणजेच घामाच्या प्रमाणांवरून व्यक्तीच्या मनात आत्महत्येचे विचार घोळत असतील तर लगेचच समजू शकेल. आत्महत्या करण्याच्या विचारात असलेल्या व्यक्तीच्या मनातील भाव ओळखून लगेचच सिग्नल कार्यरत होऊन त्यातून आवाज सुरू होईल, असं स्वीडनच्या लिंकोपींग युनिव्हर्सिटीच्या प्रयोगिक मानसशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक लार्स हाकन थोरेल यांनी म्हटलंय.

जर्मनीमध्ये ७८३ नैराश्यानं ग्रासलेल्या व्यक्तींवर हा प्रयोग करण्यात आला. वेगवेगळ्या परिस्थितीत रुग्णांवर चाचाण्या केल्यानंतर आत्महत्या करण्याच्या विचारात असलेल्या रुग्णांनी इतर रुग्णांपेक्षा पर्यावरणीय बदलास अधिक वेगाने प्रतिसाद दिला. हायपर अॅक्टिव्हिटी आढळलेल्या ९७ टक्के नैराश्याग्रस्त रुग्णांनी नंतर आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं. केवळ दोन टक्के पेशंट हायपर अॅक्टिव्ह आढळले नसल्याचं संशोधनात उघड झालं.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, September 26, 2013, 11:58


comments powered by Disqus