अरेरे.. हे काय झालं हिना रब्बानी पडल्या... "प्रेमात!!!", Heena rabbani fall in love

अरेरे.. हे काय झालं हिना रब्बानी पडल्या... "प्रेमात!!!"

अरेरे.. हे काय झालं हिना रब्बानी पडल्या...
www.24taas.com, इस्लामाबाद

अरेरे पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी - खार पुन्हा एकदा प्रेमात पडल्या.. आणि अनेक तरूणांची हदृयांचे तुकडे-तुकडे झाले.. हिना रब्बानीच्या सौंदर्यावर अनेक तरूण आपला जीव टाकत होते. आता मात्र ह्याच तरूणांना `वाट पाहावी` लागणार आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुत्तो हेदेखील हिना रब्बानीच्या सौंदर्यांने घायाळ झाले आहेत. दोघेही प्रेमात आकंठ बुडाले असून लवकरच त्यांचा निकाह होणार असल्याची चर्चा जोरात आहे.

मात्र आपल्या मुलाच्या या प्रेमावर राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी यांचा तीव्र विरोध आहे. यामुळे पितापुत्रांमध्ये कमालीचा बेबनाव निर्माण झाला आहे. हीना रब्बानी यांच्या परराष्ट्र धोरणाविषयी चर्चेऐवजी त्यांच्या सौंदर्याचीच चर्चा जोरात असते. त्यांच्या स्टायलीश दागिने, महागडे गॉगल्स, पर्स याच्या बातम्या मीडियामध्ये येत असतात पण आता चर्चा सुरू आहे त्यांच्या प्रेमप्रकरणाची. आंतरराष्ट्रीय गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्याने बांगलादेश साप्ताहिक वीकली ब्लीड्स डॉट नेट या साप्ताहिकाने पहिल्यांदा ही प्रेमकहाणी जगापुढे आणली. त्यानंतर अनेक सोशल साइटस्ने त्यात रंग भरले. १९ नोव्हेंबर १९७७ ला जन्मलेल्या हीना रब्बानी यांचे माहेर आणि सासर दोन्ही जमीनदार घराणे आहे. त्यांचे वडील पंजाब प्रांतातील बडे प्रस्थ आहे.

उच्चशिक्षित हीना रब्बानी यांनी अमेरिकेत मॅनेजमेंटची पदवी घेतली. त्यांचा विवाह अब्जोपती फिरोज गुलजार यांच्याशी झाला असून त्यांना दोन मुली आहेत.. दोन मुलींची आई असलेल्या हीना रब्बानी या बिलावल यांच्यापेक्षा ११ वर्षांनी मोठ्या आहेत. त्यामुळे त्यांच्याशी निकाह करू नये म्हणून राष्ट्राध्यक्ष झरदारी यांनी बिलावल यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघांमध्ये आता चांगलेच बिनसले आहे. निकाह करीन तर हीनाशीच असा चंग बिलावल यांनी बांधला आहे. हीना रब्बानी या पतीला तलाक देऊन, मुलींना सोडून बिलावलबरोबर राहण्यास तयार असल्याचेही वृत्त आहे. हीनाबरोबर निकाह लावून न दिल्यास बिलावल यांनी आपला कायमचा मुक्काम स्वित्झर्लंडमध्ये हलविण्याची धमकी दिली आहे.इ

First Published: Tuesday, September 25, 2012, 11:02


comments powered by Disqus