Last Updated: Tuesday, October 2, 2012, 23:32
www.24taas.com, जयपूर
इश्क वो आग है जो लगाए ना लगे और बुझाए ना बुझे... हिना रब्बानी आणि बिलावल भुट्टो यांच्यात सध्या असच काहीतरी सुरू असल्याची चर्चा सुरू आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार आणि राष्ट्रपती झरदारींचे पुत्र बिलावल भुट्टो यांच्या प्रेमसंबंधावर केंद्रीय नुतनीकरण उर्जा मंत्री डॉ. फारुक अब्दुल्ला म्हणाले, इश्क वो आग है जो लगाए ना लगे और बुझाए ना बुझे... एसएमएस मेडिकल कॉलेजमध्ये आयोजित एका कार्यक्रमासाठी रविवारी डॉ. अब्दुल्ला येथे आले होते. कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. पाकिस्तानातील चर्चित प्रेमप्रकरणाबद्दल त्यांना छेडले असता ते म्हणाले,मी त्या दोघांना भेटल्यानंतर याबद्दल नक्की विचारेल.
कारण सध्या माध्यमात येणा-या बातम्यांवरुन हे प्रेम आहे की दुसरेच काही, हे त्या दोघांना भेटल्यावरच कळेल. डॉ. अब्दुल्लांनी मी त्या दोघांना ओळखतो मात्र, अद्यात त्यांची भेट झाली नसल्याचे म्हटले.
First Published: Tuesday, October 2, 2012, 23:32