Last Updated: Thursday, March 14, 2013, 17:08
www.24taas.com, नवी दिल्लीजगातील सर्वात आकर्षक राजकीय महिलांमध्ये पाकिस्तानच्या परराष्ट्रीय मंत्री हिना रब्बानी-खार यांनी पहिलं स्थान पटकावलं आहे. इंडिया टुडे या मासिकातर्फे करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार ही माहिती पुढे आली आहे.
पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या तिकीटावर निवडणूक लढवत संसदेत जाणाऱ्या हिना रब्बानी ह्या त्यांच्या दिलखेचक अदा आणि त्यांच्या फॅशनेबल राहण्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत असतात. या यादीमध्ये अमेरिकेच्या परराष्ट्रीय मंत्री हिलरी क्लिंटन या नवव्या स्थानावर आहेत.
तर टॉप टेनच्या लिस्टमध्ये सोनिया गांधी, प्रियंका गांधी कॅनडाच्या राजकारणी महिलांपैकी रूबी ढल्ला आणि युक्रेनच्या माजी पंतप्रधान युलिया तिमोशेंको यांचा समावेश आहे. तर जॉर्डनची राणी रानिया अल अब्दुल्ला आणि मिशेल ओबामा ह्या अनुक्रमे ११व्या आणि १२व्या स्थानावर आहे.
First Published: Thursday, March 14, 2013, 17:08