हिना रब्बानी-खार यांना `पीपीपी`चा जोरदार धक्का, heena rabbani khar didn`t get election ticket

हिना रब्बानी-खार यांना `पीपीपी`चा जोरदार धक्का...

हिना रब्बानी-खार यांना `पीपीपी`चा जोरदार धक्का...
www.24taas.com, लाहोर

पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी)च्या उमेद्वारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आलीय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या यादीमध्ये पाकिस्तानच्या माजी परऱाष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांच्या नावाला बगल दिली गेलीय.

पाकिस्तानात येत्या ११ मे रोजी सार्वत्रिक निवडणूक होतेय. याच निवडणुकीसाठी पाकिस्तान पीपल्स पार्टीसहित पाकिस्तानातील इतर पक्ष आणि राजकीय नेते डोळे लावून बसलेत. याचीच तयारी म्हणून पीपीपीनं आपल्या अधिकृत उमेद्वारांची यादी जाहीर केली. पंजाब प्रांतातील उमेद्वारांच्या यादीत हिना रब्बानी खार यांच्या नावाचा समावेश नाही.

पीपीपीनं शुक्रवारी दक्षिण पंजाबच्या नॅशनल असेम्ब्लीच्या सर्व जागांसाठी उमेद्वारांची यादी जाहीर केली. हिना यांचे वडील गुलाम रब्बानी खार हे मुजफ्फरगड जिल्ह्यातील १७७ क्रमांकाच्या जागेवरून पीपीपीच्यावतीनंच ही निवडणूक लढविणार आहेत.

२००८ साली हिना रब्बानी या याच म्हणजे १७७ क्रमांकाच्या जागेवरून निवडून आल्या होत्या. नुकतंच, आपण या निवडणुकीत उभं राहण्यासाठी इच्छुक नसल्याचं हिना रब्बानी खार यांनी म्हटलं होतं.

First Published: Saturday, April 13, 2013, 11:07


comments powered by Disqus